me sainik boltoy essay in marathi -
सैनिकाचे मनोगत मराठी निबंध -
मेलो तर मेलो त्यात काय एवढ मनाला लावून घ्यायच, माझ्यासारखे शेकडो जवान मरतात की इथे त्यातलाच मी एक... नित्यनेमाने हे घडतय व घडत राहील त्यामुळे तुम्ही काही याचे सोयरे सुतक बाळगू नका...सरकार काय कोणतही असू, काही फरक नाही पडत, 1947 पासून ते 2018 पर्यंत पाकिस्तानच कोणी का
य उखडले, आमच रहाटगाडगे हे असच चालू राहणार आमच्या बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये भ्रष्टाचार हो नाहीतर हत्यारात...त्यात आमचा जन्म हा मरण्यासाठीच अशी सर्वांची समज...तुम्ही देशवासियांनो आपापसात भांडण न करता आनंदी रहा म्हणजे बस्स...
me sainik boltoy essay in marathi - सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध |
य उखडले, आमच रहाटगाडगे हे असच चालू राहणार आमच्या बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये भ्रष्टाचार हो नाहीतर हत्यारात...त्यात आमचा जन्म हा मरण्यासाठीच अशी सर्वांची समज...तुम्ही देशवासियांनो आपापसात भांडण न करता आनंदी रहा म्हणजे बस्स...
celebrityच्या मरणावर कोणी गळा काढ-काढून रडावेआणि आमच्या शवावर किमान 1 फुल ही न चढावे ?हेच आमचे दुर्देव असो...
हो आठवतय मला दोन वर्षांपूर्वी कुठे बारावी पास झालो अजून पदवी संपादन करून मजेत आयुष्यात जगायच होत, कॉलेज life ची मज्या, आवडीचे खेळ त्यानंतर मस्तपैकी नोकरी, सर्व सरकारी सुट्ट्या अशी भरपूर स्वप्न पहिली होतीत की मी... स्वप्न साकार करायला मी पहिल्या वर्षात प्रवेश सुद्धा घेतला...मंग काय मस्त चालू होत आयुष्य, मी कुठे क्रिकेट, खो खो खेळत असताना, माझे जोडीदार पोलीस भरती, आर्मी, bsf, airman होण्यासाठी कॉलेजच्या ग्राउंडवर उन्हा-तानात पडून असायची तेव्हा माझ्या मनात सुद्धा विचार आला की, ही पोर अशी जीवाच रान करून धावपळ का करतायेत, मस्त पदवी नंतर जिल्ह्यातील सरकारी नोकरी करायची किंवा खाजगी नोकरी करून वातानुकूलित खोलीत जायच, हाताखालून दोन, तीन file रंगवायच्या व स्वतःच्या ac गाडीत घरी जायच, कुटूंबासोबत मज्या मस्ती करायची, कश्याला हे नसते उद्योग, देशसेवा व समाजसेवा करण्याचे...
आमदाराच पोरग, अभिनेत्याच, क्रिकेटरच, म्हणजे अश्या दिगग्ज लोकांची मुले कधी अशी धावपळ करताना किंवा अशी भरती साठी मेहनत करताना नाही पाहिलीत, कोणा सैनिकांना मदत करताना नाही, की देश सेवेसाठी बलिदान देताना तर अजिबात नाही मंग ही पोर का धावपळ करतायेत, देशासाठी की पोटासाठी ही धावपळ याच उत्तर अजून काहींना मिळाले नाही...
मला मात्र उत्तर चटकन मिळाले, जर पोटाचा, स्वतःच्या घराचा विचार केला तर भगतसिंग घडले नसते, आमचे रक्त मात्र भगतसिंग, राजगुरू, आझाद व सुखदेवचा आदर्श समोर ठेवणारा होता, मंग त्याच जिद्दीवर झालो संरक्षण खात्यात भरती...
भरती झाल्यावर काय तो थाट माझा, गावात लोकांनी डोक्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढली, being human एवढा पैसा नसला वशिला जरी नसला तरी आख्या गावाला जेवण खाऊ घातल होत माझ्या शेतकरी बापानी...खरच माझ्या आई-बाबांच्या डोळ्याचे पारणे फिटले होते तो सभारंभ पाहून, कोणा पुढाऱ्याला पण नाही बोलवल की आमदाराला, मन खात हो यांना बोलावून, आम्ही इकडे जीवावर उदार होऊन देश वाचवतो व हे तुमच्या मदतीने तिकडे तुमचेच जीव घेऊन देश पोखरतात हो...ही लोक वरच्या वर वैरी व आतून पराकोटीचे मित्र असतात ते जात, धर्म पहात नाहीत आणि आपण कार्यकर्ते मात्र जाती वरून, समाजावरून एकमेकांचे दुष्मन बनून जातो...आपल्याला कधी समजणार हो या गोष्टी...
आणि ही बिकाऊ मीडिया, कोण तो तैमुर की काय त्याला साधी सर्दी जरी झाली तरी थेट प्रक्षेपण करतील, पण कधी पीडित जवानांच्या मुलाखती त्याच्या समस्या नाही दाखवणार...की त्यांना जेवण ठीक मिळते की त्यांची हत्यारे ठीक आहेत...लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणायला लाज ही वाटत नाही ह्या मीडिया वाल्याना...
सिनेमा पाहताना राष्ट्रगीताला मान द्यावा का न द्यावा यावर मुलाखती होत असतील तर, कशी बिनवणार हो नवीन मुलांमध्ये देशभक्ती मंग कश्याने धजावेल कोणी देश सेवेसाठी जेथे सैनिकांना इज्जत नाही की आवश्यक सुख सुविधा, आम्ही फक्त तुमच्या प्रेमाचे भुकेले हो हीच ताकद आम्हाला इकडे जगण्यास मदत करते जर देशातच शत्रू असतील तर बाहेरील शत्रू सोबत कसे दोन हात करणार आम्ही लोक.. असो तरी गरम रक्त आमच हे देश सेवेसाठीच सदा सर्वदा वाहणार, कोणी मल्ल्या, मोदी देश सोडून जावो की लुटून जावो, आमचे कर्त्यव्यात कसूर न होणे...
माझे ट्रेनिंग झाल्या झाल्या पहिली पोस्टिंग काश्मीर...मनात हूर हूर ? छे ती काय असते ? आणि का करावी, एकदा का ही वर्दी अंगावर घातली की, नाही राहत काही भीती की नाही जाणवत समस्येचे डोंगर, इकडे वय वगैरे अस काही नसत, वय 20 वर्षे असो किंवा तो कोणी निवृत्तीसाठी आला असला तरी तो जवानच असतो....हो त्या दिवशीचा दिवस काय मस्त होता... कदाचित तो माझ्यासाठीच ईश्वराने खास राखीव ठेवला असावा, मी मस्तपैकी माझा ड्रेस करून गळ्यात हत्यार अडकवून माझ्या पॉईंट वरती गस्त करीत होतो व अचानक झालेल्या गोळीभारामुळे काहीसा भांबावून गेलो मात्र लगेचच सावध पवित्रा घेतला, त्या गोळीभारास काही तास योग्य जशास तसे उत्तर सुद्धा दिले, परंतू
बेताब हमारे दिल में इक मस्ती सी छायी है
ऐ देश अलविदा तुझको कहने की घडी आई है
महकेंगे तेरी फिज़ा में हम बन के हवा का झोंका
किस्मत वालों को मिलता ऐसे मरने का मौका
म्हणत कधी गोळी शरीरात घुसून असह्य यातना झेलत जमिनीवर पहुडलो समजल नाही हो...आणि अचानक कानी गुमु लागले इकडे कामावर येण्या अगोदरचे आईचे ते अखेरचे शब्द...
"शुभम बाळा तुला कधी घरापासून वेगळा करून दिला नाही, की माझ्या ह्रदयापासून, तीळ तीळ जपला तुला, सांग रे परत कधी हे गोड तोंड दाखवशील लवकर येरे बेटा वाट पाहते मी"
ये आई तुझी प्रतीक्षा संपली ग, "बघ मी आलोय तेही तिरंग्यात लपेटून पुरी भारतीय सैना घेऊन आलोय बघ, देश सेवेसाठी वयाच बंधन नसत ग, हे दाखवून दिले तुझ्या लेकरांनी या जगाला"... बघ तू फक्त रडू नकोस, नाही पाहवणार तुझी ही आसवे, उलट तू ताठ मानेने जग, तो हक्कच तुला माझ्या विरगतीने मिळाला आहे, बाहेर फिरताना लोक म्हणतील, अरे ती पहा शुभम ची वीरमाता जात आहे, ये आई फक्त कोणा राजकारणांच्या भूलथापांना बळी पडू नकोस ग, हे सांगायची सुद्धा तुला गरज नाही, कारण तुझी अपेक्षा तरी किती ग...दोन वेळेच जेवण व निवाऱ्याला घर...बस्स सर्वसामान्य लोक आपण जास्त अपेक्षा असणारी स्वप्न सुद्धा महाग आपल्याला, माझ्या चितेचे लोट जरी आकाशी गेले तरी मी इथेच असे बर...फक्त डोळे मिट व बाळा शुभम अशी हाक मार, बघ मी पळत पळत येईल...खरच ग आई मी पळत पळत येईल...तूर्तास रजा दे तुज्या लेकरास...मला पुढील जन्मासाठी तुझ्या उदराची बोली करायची आहे ग देवांसोबत..चल ग आई तूर्तास रजा घेतो, आशीर्वाद असू दे.....
मेरी बचपन की यादे और माँ बाप का ख्वाब कोई और भी थागावकी हर इक गलियोंमो गूंजता हरएक शोर कभी मेरा भी थाकैसे भूल जाऊ उस गावकी गलीमें उस सड़क पार एक छोटासा घर मेरा भी थालेकिन मरते दम तक ये भी न भूल पाया ये दोस्त,की इस जहा में इक हिंदुस्तान 🇮🇳 मेरा भी था...की इस जहा में इक हिंदुस्तान 🇮🇳 मेरा भी था...
लेखन - शैलेश कदम यांच्या wall वरून घेतले आहे त्याची link खाली देत आहे
Copyright by marathiholic.com website