माझी शाळा मराठी निबंध

Majhi shala - माझी शाळा मराठी निबंध


आज आपण माझी आवडती शाळा - majhi avdati shala - my school essay in marathi यावर मराठी निबंध लिहायला सुरवात करूया. 

My school essay in  marathi 


माझी शाळा मराठी निबंध - my school essay in marathi


शाळा म्हणजे एक मंदिर आहे जिथे शिस्त, शिक्षण, शिक्षक व विद्यार्थी वास करतात.  मुला मुलींच्या सार्वत्रिक विकासात शाळेची भूमिका महत्वाची असते.  प्रत्येक विद्यार्थ्याला स्वत: च्या शाळेचा अभिमान आहे आणि मला सुद्धा माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे.

आमच्या शाळेत चांगले, आदर्श व कुशल असे शिक्षक आहेत.  आम्हाला समजून घेण्यात मदत करण्यासाठी ते बोलक्या उदाहरणांसह शिकवतात व आम्हाला याची अभ्यासात खूप मदत होते.   

ग्रंथ हेच गुरु मराठी निंबध

माझ्या शाळेच्या वार्षिक निकालाने महाराष्ट्र राज्यात चांगले नाव कमावले आहे.  आमच्या शाळेतील मुलांनी प्रश्न उत्तरे, गाण्याचे स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, खेळ, लेझीम इत्यादी मध्ये भरपूर बक्षिसे जिंकली आहेत.

आमच्या शाळेत मोठे वर्ग, भव्य खेळाचे मैदान, प्रयोगशाळा, स्वच्छ शौचालय, मोठे ग्रंथालय आहे.  

मुलांसाठी क्रिकेट किट, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि इतर खेळाच्या उपकरणे देखील आहेत.  

कबड्डी, खो खो असे खेळ PT चे  शिक्षक शिकवतात. आम्ही अनेक आंतरशालेय स्पर्धांमध्ये पारितोषिक जिंकलेली आहेत.

आमच्या शाळेतील शिक्षक केवळ वाचन, क्रीडाच नव्हे तर मुलांच्या कौशल्य विकासासाठी देखील बर्‍याच उपक्रम राबवतात.  तसेच योगा आणि मानसिक आरोग्यासाठी ध्यानधारणा सुद्धा करून घेतात.  

आमच्या शाळेत शिक्षणाची चाचणी घेण्यासाठी वर्षाभरात चार लहान चाचण्या आणि दोन मोठ्या चाचण्या असतात.  यामुळे आपण अभ्यासात केलेली चूक सुधारण्यास मदत होते.  

दरवर्षी शालेय वर्धापन दिन हे खास आमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्यासाठी आयोजित केले जाते.  नाटक, नृत्य, गाणे इ.  आणि स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती आणि महाराष्ट्र दिन उत्सव साजरा करतात.  आम्ही यात आनंदाने भाग घेतो.

मी फुलपाखरु झालो तर मराठी निबंध

आमच्या ह्या लाडक्या शाळेला राज्याचा मॉडेल स्कूल पुरस्कारही देण्यात आला आहे.  तर आमची शाळा आमची आवडती जागा आहे.  इथे मन रमते व मित्रत्व वाढीला लागते. आम्हाला आमच्या शाळेचा अभिमान आहे.

माझी शाळा मराठी निबंध कसा वाटला नक्की खाली प्रतिक्रिया द्या व तुम्ही लिहिलेला निबंध आम्हाला पाठवा तो आम्ही इकडे पोस्ट करू.

हिंदीमध्ये निबंध हवे असतील तर येथे क्लिक करा

धन्यवाद - team #essaysmarathi 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने