शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी
Shetkari atmakatha in marathi essay
नमस्कार मित्रांनो, आज आपण शेतकऱ्याचे मनोगत - shetkaryanche manogat हा निबंध लिहणार आहोत.
राजा मी शेतकरी, शेतकरी राजा मी शेतकरी,धरणी मायेचा पुत्र मी शेतकरी, जगण्याचे सुत्र मी शेतकरी...
आपण सुखाचे आयुष्य जगण्यात काही लोकांचा म्हत्वपुर्ण वाटा आहे. ते म्हणजे सिमेवरील सैनिक, राज्यातील पोलीस, आरोग्य सेवक आणि शेतात राबणारे शेतकरी. यांचे आपण नेहमी आभार मानले पाहिजेत.
आपल्या देशात १२.५६ कोटी मध्यम व छोटे शेतकरी आहेत. ह्या सर्व शेतक-यांचे सरासरी उत्पन्न २०,४०० रुपये होते. म्हणजे वर्षाकाठी मला फक्त १० हजार रुपये खर्चायला मिळतात. त्यामधे मला शिक्षण, आरोग्य, लग्न, सण, करमणुक इत्यादी गोष्टीचा सांभाल करायला लागतो. पण तरीही मी लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधून खूश राहण्याचा प्रयत्न करतो.
माझे सर्व जिवन शेतात काबाडकष्ट करण्यातच निघुन जाते. शेतकरी बनणे सोपे काम नाही. एका शेतकऱ्याचे जीवन खूप सार्या कष्टांनी भरलेले असते. मी वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता मेहनत व प्रामाणिकपणे काम करतो.
माझ्या कामाची वेळ काय ठरलेल नसतेती, त्यात आपले वीज महामडंळ वेळी अवेळी वीजेची समस्य निर्माण करते, त्यामुळे मला मात्र थंडीच्या रात्री शेतात जाऊन पिकाचे रक्षण व पिकाला पाणी द्यावे लागते. यावेळी थंडीच्या दिवसात लोक घट्ट पांघरून झोपून राहतात.
त्यात महागाई वाढली मात्र आमच्या पिकाचे भाव, धान्याचे भाव काय वाढले नाहीत. लोक भाजीपाल्याचा भाव पाडुन मागतात. बाहेर ह़़ॉटेलमध्ये, सोना-याच्या दुकानात कधी भाव करणार नाहीत मात्र आमच्याकडे भाजीपाला घेताना नक्की भाव करनार.
त्यात कीटकनाशके व इतर शेतीसाठी उपयुक्त साहित्याचे भाव देखील वाढत आहेत. त्यामुळे मला माझ्या गरजा पुर्ण करण्यासाठी घरच्यांना पोसायला मला कोणाकडून तरी पैसे उसनवार घ्यावे लागतात व दोन वेळेचे अन्न माझ्या कुटुंबाला उपलब्ध करून द्यावे लागते नाहीतर काय अर्थ माझ्या जगण्याचा असण्याचा.
एकूण शेतकरी पूर्णपणे परावलंबी झाला. सरकार, सरकार ज्याच्या हाती तो राजकीय पक्ष, त्या राजकीय पक्षाचा विचार आणि आचार, यांच्या ताब्यात शेतकरी गेला. थोडक्यात असं की शेतकऱ्याचा ताबा सरकारनं घेतला. स्वातंत्र्यापूर्वीही राजा-जमीनदार-ईस्ट इंडियाकडं ताबा होता, तो आता भारत सरकारकडं गेला.
ठराविक शेतक-यांना कर्जमाफी, शेतमालाचा भाव ठरवणं, दरवर्षी काही रक्कम शेतकऱ्यांना सरसकट वाटणं, रासायनिक खतं-वीज-बियाणं-पाणी इत्यादीत सवलती देणं या उपायांनी शेतकऱ्याची आत्महत्या टळणार नाही.
सरकारने शेतक-यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून द्यावी, बाजारपेठा उपलब्ध करून त्यांना प्रोत्साहन देवुन जोडधंद्यासाठी मार्गदर्शन करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठा उपलब्ध करून द्यावात. शेतक-यांच्या समस्या सोडवाव्यात जेणेकरून कोणी आत्महत्या करणार नाही.
जय जवान जय किसान हे लालबहादुर शास्त्री यांचे वाक्य पुन्हा अजरामर व्हावे हीच इच्छा.