zadache atmavrutta nibandh in Marathi
झाडाचे मनोगत
झाडाचे मनोगत |
कसे आहात सर्व, ओळखले का मला ? मीच तो तुम्हाला उन्हाळमध्ये सावली देणारा ! भूक लागल्यास फळे खायला देणारा, तहान लागल्यास नारळ पाणी देणारा व देवाला वाहण्यासाठी रंगबेरंगी फुले देणारा सांगा बर आता मी कोण ?
बरोबर ओळखले मी झाड, माझा जन्म लहान अश्या बियापासून होतो, लहान असताना जस सर्वांना जपावे लागते तसेच मला सुद्धा जपावे लागते. कारण मी लहान असताना मला योग्य प्रमाणात पाणी द्यावे लागते, खत द्यावे लागतेज सूर्यप्रकाश माझ्याजवळ पोहोचला पाहिजे.
प्राण्यांपासून मला वाचवायला लागते नाहीतर ते येऊन मला खाऊन टाकतात. या सर्वांची काळजी घ्यावी लागते तेव्हा कुठे माझी वाढ होते व मी तुमच्या सेवेला हजर असतो.
माझ्या मुळे सर्व विश्व आहे ही गोष्ट मात्र तुम्हाला मान्य करावी लागेल. कारण मी निर्माण केलेल्या ऑक्सिजन मुळे सर्व सजीव प्राणी श्वसन करून जीवन जगत आहेत.
परंतु काही समाजकंटक लोक जंगलात जाऊन किंवा गावातील हिरव्या गार ठिकाणी आर्थिक फायद्यासाठी झाडांची कत्तल करीत आहेत. काही लोक डोंगराला वणवे लावून छोटी छोटी झाडे जाळून टाकत आहेत.
तशी भरपूर लोक माझ्यासाठी कष्ट करीत आहेत, अनेक वृक्ष लावत आहेत, त्यामध्ये औषधी झाडे, फुलांची झाडे, फळांची झाडे अनेक वेळी यांचा समावेश होतो, डोंगरावर झाडे मोठ्या प्रमाणात असतील तर जमिनीची धूप रोखली जाते, पाऊस सुद्धा चांगल्या प्रकारे पडतो, प्राणी, पक्षी यांचा वावर वाढतो.
मित्र मैत्रिणीनो तुम्ही किमान 1 - 1 झाड लावले तरी आम्हाला समाधान मिळेल तसेच ओझोनचा थर सध्या कमी कमी होत आहे त्यामुळे global warming चा धोका वाढत आहे तर कृपा करून झाडे लावा झाडे जगवा.
आपण आता परत भेटू कोणत्यातरी वळणावर अचानकपणे धन्यवाद.