ग्रंथ हेच गुरू - Granth hech Guru essay in marathi

Granth hech Guru - ग्रंथ हेच गुरू

Granth hech Guru marathi nibandh

ग्रंथ हेच गुरू 




वाचण्याची, लिहिण्याची आणि अक्षरे छापण्याची कला माणसाने आत्मसात केली त्याकाळापासून ग्रंथ हेच माणसाचे खरे गुरू असल्याचे मानायला हव.

गुरु कोणाला मानावे, गुरू कोणाला समजायचे जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ, दानशूर, स्वावलंबी, अज्ञानाचा अंधार दूर करणारा, आपल्यातील माणसाला घडविणारा असेल त्यास गुरू म्हणावे.

ग्रंथातून भरमसाठ ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे सोपवता येते. माणसाच्या डोळे दिपविणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीचे रहस्य या ग्रंथातच दडले आहे की.


हे ग्रंथ एकाकीपणात, वाईट काळात, आपल्याला धीर देतात, आधार देतात. म्हणूच कितीतरी थोर व्यक्तींची तुरुंगात रवानगी झाली असता त्यांनी त्या 
अंधार कोठडीत खूप वाचन केले, अफाट लेखन केले.
 

ग्रंथ हेच गुरू 


लोकमान्य टिळकांच्या गीता रहस्याचे लेखन तुरुंगातच झाले. स्वातंत्र्यवीर विनायक  दामोदर सावरकरानी तर 'कमला' हे खंडकाव्य अंदमानच्या काळकोठडीच्या भिंतीवर घायपाताच्या काट्याने लिहून काढले.

एकप्रकारे ग्रंथ हे आपले गुरू, मित्र, पालक म्हणुन आपली साथ देतात,  ग्रंथ आपल्याला इतके देतात आणि त्याबदल्यात धनाची, कौतुकाची थोडीही अपेक्षा ते करत नाहीत. आपल्याला अभ्यासातले काही विषय कधी लवकर समजला नाही तरी कधी चिडत नाहीत रागवत नाहीत.


जो प्रदेश आपण कधी पाहिला नाही त्याचे बारकाव्यांसकट दर्शन अनेकांच्या प्रवास वर्णनातून आपणास घडत असते, भूतकाळातील महान व्यक्तींवरील रसाळ ग्रंथाचे वाचन करताना त्या त्या व्यक्तींच्या कर्तृत्वाची संपूर्ण कल्पना आपणास या ग्रंथाच्या मधूनच तर येते.


मनोरंजन करता करताच हसतखेळत हे ग्रंथ आपल्याला ज्ञान देत असतात. ते आपणास उत्तम रित्या घडवत असतात. ते आपले केवळ मित्र नसतात तर ते आपले गुरु सुद्धा असतात. याच कारणासाठी वाचनाचा छंद आपण जोपासायला हवा. आपला रिकामा वेळ वाचनासाठी कामी लावला पाहिजे.

प्रत्येक गावात, गावातल्या लहान लहान भागात एकेक छोटेसे वाचनालय असावे. ज्यांना वाचायची आवड आहे. त्यांना चांगली पुस्तके वाचायला मिळायलाच हवीत. कारण ग्रंथ केवळ गुरुच नाहीत तर मित्रही. 

संत रामदास स्वामी यांनी सांगितले आहे की, दिवसा मागे काहीतरी वाचावे व दिवसा मागे काहीतरी लिहीत जावे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने