माझी आजी वर मराठी निबंध - my grandmother essay in marathi

माझी आजी वर मराठी निबंध - my grandmother essay in marathi


आज आपण माझी आजी यावर मराठी निबंध लिहीणार आहोत. प्रत्येकाला आजी हवीहवीशी वाटते, त्यामुळे माझी आजी यावर निबंध लिहीलाच पाहिजे. असे माझे वैयक्तिक मत तर चला सुरुवात करूया माझी आजी माझी आजी वर मराठी निबंध - my grandmother essay in marathi हा निबंध लिहायला.
 

माझी आजी वर मराठी निबंध - my grandmother essay in marathi
माझी आजी वर मराठी निबंध - my grandmother essay in marathi


माझी आजी निबंध


माझी आजी तिचे नाव लीलावती तांबे, वय 70 वर्षे अजूनही चांगल्या पद्धतीने बोलते, ऐकते, तिला अजूनही दिसायलाही खूप चांगले दिसते, अजून चष्मा वगैरे लागलेला नाही. 

तिचे शिक्षण सुद्धा त्यावेळचं मॅट्रिक पर्यंत झालेलं असं माझे आजोबा मला सांगायचे, माझ्या आजीचे लग्न वयाच्या विसाव्या वर्षी झालेले. कारण पूर्वीच्या काळी मुलींचे लग्न हे खूप लवकर होत.

माझ्या आजीला पूर्ण गावात लीला आजी म्हणून सर्व लोक ओळखतात. कारण ती जेवण खूप छान बनवते, सर्वांशी प्रेमाने वागते, कोणाच्याही मदतीला लवकर धावून जाते. त्यामुळे ती गाव मध्ये खूप प्रसिद्ध आहे. 

माझी आजी अजून ही सकाळी लवकर उठते, आंघोळ वगैरे उरकल्यानंतर, बागेतील फुले गोळा करून देवाला वाहते व देवपूजा करते.  त्यानंतर ती गावातील मंदिरांकडे चालत जाते व तेथील देवाची मनेभावें पूजा करते. 

ती खूप धार्मिक व्यक्ती आहे, घरी आल्यानंतर ती आणि माझी आई सोबत स्वयंपाकामध्ये मदत करते.  सकाळी नाश्ता केल्यानंतर सगळ्यात पहिला नाश्ता मला आणून देते व स्वतः हाताने खाऊ घालते. मला खूप खूप बरे वाटते, ज्या वेळेस आजी माझी अशा प्रकारे काळजी घेते. 


मला आजीच्या हातचे केलेले पोहे खूप आवडतात,  त्यामुळे माझी आजी मला आवर्जून पोहे तयार करून मला खायला घालते. 
रात्री झोपताना सुद्धा माझी आजी मला वेगवेगळ्या प्रकारच्या छान छान गोष्टी सांगते. तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या कविता मला गाऊन दाखवते तिचे मनाचे श्लोक हे तोंडपाठ आहेत तसं तिच्या काही प्रार्थना हरिपाठ भजन हे सुद्धा तोंडपाठ आहेत.

माझे वडील लहान होते व माझे आजोबा कामावर जायचे, त्यावेळी माझी आजी सर्व घर चालवत होती. ती व्यवहाराला काटेकोर आहे व तसेच शिस्तप्रिय सुद्धा आहे. कोणतीही गोष्ट असो की खोटे बोलत नाही,  ती खरे असेल तेच तोंडावर बोलून दाखवते. 

आजी बोलते कोणाला राग आला तरी चालेल, पण खोटं बोलायचं नाही,  कारण जे काही असेल ते तोंडावर बोलून मोकळं व्हायचं, म्हणजे पश्चाताप होत नाही. माझ्या आईला सुद्धा ती स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळते व शिस्ती मध्ये वागवते.  

My grandmother essay marathi 


त्यामुळे माझे त्याचे खूप कौतुक वाटते, मला कधी कधी खायला किंवा ice cream घ्यायला पैसे नसतील तर माझी आजी मला स्वतःहून पैसे देऊ करते. तसेच दर आठवड्याला मला ती काही पैसे सुद्धा खर्चायला देते. 

कधी माझी आजी तालुक्याच्या ठिकाणी गेली तर माझ्यासाठी खेळणी व गोड गोड खायचे पदार्थ,  वडापाव सुद्धा घेऊन येते, त्यामुळे मला माझी आजी खूप आवडते.  

आजी चा हातावर वयामुळे सुरकुत्या पडलेल्या आहेत आणि चेहऱ्यावर सुद्धा सुरकुत्या पडलेल्या आहेत. तिचे दात सुद्धा बऱ्यापैकी पडलेले आहेत. तरीसुद्धा मला माझी आजी खूप आवडते, कारण माझी आजी ही माझी फक्त आजी नसून एक माझी मैत्रीणच आहे असं मला वाटतं.

झाडाचे आत्मवृत्त मराठी निबंध
 
मी लहान असताना माझी आज्जी मला अंगणवाडीमध्ये सोडायला स्वतः घेऊन यायची, माझे दप्तर स्वतःसोबत घ्यायची तसेच माझी पोलिओ लसीकरण जेव्हा असतील, तेव्हा माझी आजी मला आवर्जून दवाखान्यामध्ये घेऊन पोलिओ लस पाजायची. असं माझी आई मला नेहमी सांगते. 

मी पहिली ला जाताना सुद्धा माझी आजी मला शाळेमध्ये सोडायला, स्वतःसोबत यायची. आता मात्र मी मोठा झालो हायस्कूलमध्ये जाऊ लागलो, तरी माझी आजी माझं दप्तर सावरून,

त्यामध्ये डब्बा पाणी भरून मला जाऊ देते. त्यामुळे मला तिची खूप अप्रूप वाटते मला माझी आजी त्यामुळे खूप खूप आवडते

माझे आजोबा सुद्धा मला मित्राप्रमाणे वागवतात व कधी कधी आजोबा सुद्धा आजीची खूप मस्करी करतात. आजीला खूप चिडवतात,  त्यावेळेस आणखी लाजून घराबाहेर निघून जाते.  मला तो क्षण खूप आवडतो.

अजून सुद्धा आम्ही जेवण करायला सर्व एकत्रित बसतो,  त्यामुळे घराच घरपण टिकून राहते. मलासुद्धा हे वातावरण खूप आवडते. आजी सांगते माणसाचं मोठेपण हे त्याच्या पैशामध्ये, बंगल्यामध्ये, नोकरीमध्ये नाहीतर त्याच्या मनामध्ये असते.

माणसाचे मन हे नेहमी साधे असावी निस्वार्थ असाव. तरच माणूस म्हणून जगायला, ती व्यक्ती चांगली असते. त्यामुळे मला माझ्या आजीचा हा स्वभाव खूप खूप आवडतो. तर चला मित्रांनो माझी आजी माझी वाट बघत असेल, मी आता तिकडे जातो कारण खूप वेळ झाली चला बाय.

तर मित्रांनो कसा वाटला माझी आजी - my grandmother essay in marathi यावर मराठी निबंध कमेंट करून नक्की सांगा. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने