मी सह्याद्री बोलतोय मराठी निबंध - Me sahyadri boltoy marathi niband

मी सह्याद्री बोलतोय मराठी निबंध - Me sahyadri boltoy marathi nibandh 


नमस्कार मित्र मंडळी, कसे आहात सह्याद्री मध्ये फिरण्याचा आनंद घेत आहात ना ? फिरता फिरता तिचे पावित्र्य मात्र जपण्याचा प्रयत्न करा ही ! तर आज आपण घेऊन आलो आहोत, आत्मवृतात्मक निबंध - मी सह्याद्री बोलतोय मराठी निबंध. Me sahyadri boltoy marathi nibandh, Me sahyadri boltoy essay in marathi. तर सुरू करूया सहयाद्रीचे पर्वताचे मनोगत मराठी.

 मी सह्याद्री बोलतोय निबंध


नमस्कार दोस्तहो ओळखत का मला, अहो मीच तो ज्याने आदिलशाही, निजामशाही व मुघलांना सळो की पळो करते वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सोबत होतो.

राजगड, रायगड, तोरणा, शिवनेरी हे सर्व तर माझ्या छत्रछायेखाली आहेत, महाराष्ट्रातील 1646 मीटर उंची असलेले कळसुबाई शिखर सुद्धा माझेच की ! 


मी सह्याद्री बोलतोय मराठी निबंध - Me sahyadri boltoy marathi nibandh

मी सह्याद्री बोलतोय मराठी निबंध - Me sahyadri boltoy marathi nibandh



भरपूर लोकांना मला भेटायला, माझ्या सानिध्यात राहायला आवडत, पावसाळा सुरू झाला की, लोक, वन्यमित्र, छायाचित्रकार मला भेटायला येतात. 

बरोबर ओळखलंत मला ! होय मीच तुमचा लाडका सह्याद्री पर्वत. होय मी सह्याद्री बोलतोय, तापी नदी पासून ते कन्याकुमारी पर्यंत अवाढव्य असा पसारा माझाच की ! होय मीच तुमचा महाराष्ट्राचा पश्चिम घाट.

माझ्यामुळे तर कोकण व देश दोन्ही वेगवेगळे झालेत, कृष्णा - भीमा - गोदावरी - तापी यांना वेगवेगळे करून त्यांचे प्रवाह बदलणारा मी सहयाद्री बोलतोय. 

मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, तुमच्यासारखे जीवा भावाची मऱ्हाट मोळी माणस मला मिळाली, ज्याचे मोल नाही करता येणार. ह्या सह्याद्रीला जगायला व प्रेम करायला तर तुम्हीच शिकवलत. 

मी महाराष्ट्र राज्याबद्दल माझ्या मनी नेहमीच आदरभाव असतो व असेल. म्हणून एक ओळ नेहमी माझ्या तोंडी गुणगुणत असते, मंगल देशा - पवित्र देशा - महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा.

नटसम्राट चित्रपट तर सर्वांनी पाहिला असेल, मित्रहो मी सुद्धा एक नटसम्राट आहे, मी सहयाद्री बोलतोय, अहो मीच त्या कोकणच्या श्रावणधारा, मीच हरिश्चंद्राचा कोकणकडा आणि मीच तव सातारचे कास पठार होय मी सह्याद्री अनेकवेळा असंख्य भूमिका करतो, आणि फक्त माझी जागा हा तुमचा सह्याद्रीच घेऊ शकतो.

त्या नटसम्राटा सारखे दुःख सुद्धा माझा पदरी आहे, उदयोग धंद्यासाठी मला पोखरल जात आहे, मला होत आहेत. ह्या सहयाद्रीला सुद्धा होतात, त्या jeb, पोकलेनच्या जबरी घावाने असह्य वेदना.

Me sahyadri boltoy nibandh 


पण, पण माझ्या वेदना ह्या कोण ऐकणार ! कोणाला पडले याचे, ज्या ठिकाणी मोठ मोठाली जंगले होती, आता तिथे सर्व झाडी तोडून सिमेंट, कोकरेंटमध्ये शहरे उभी राहत आहेत, माझ्या छाताडावर पाय देऊन ! 

कस सहन करतो हे माझे मलाच माहिती ! जिथे लोक अगोदर पावसाळा सुरू होण्यापूर्वी भरपूर प्रमाणात झाडे लावत होती, आता तीच माणसांना झाडे नको झालीत ! 
फक्त घरच्या बाल्कनी मध्ये, टेबल वर ठेवण्यापुरता का माझा उपयोग ?

हे मानवा विसरू नकोस एक वेळ अशी येईल, जेव्हा तुला श्वास सुद्धा विकत घ्यावा लागेल, लोकसंख्येचा भस्मासुर, वाढते प्रदूषण, त्यात जल प्रदूषण, वायू प्रदूषण आलेच की. कोरोनाच्या सारख्या महामारी मध्ये तरी अनेक जण ऑक्सिजन नसल्याने दगावली. 



ही वेळ कोणी आणली ? ह्याला कारणीभूत कोण ? तर ह्याचे उत्तर मिळेल मनुष्यप्राणी. कारण तुम्ही सह्याद्री जेवढा पोखराल तेवढा काय त्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला होणार आहे आणि भविष्यात तो त्रास वाढत जाईल.

पंरतु याला अपवाद आहेत बरका ! जसे की सह्याद्री अभयारण्य, नवेगाव गोंदिया अभयारण्य, कर्नाळा पक्षी अभयारण्य, कोयना, मेळघाट, ताडोबा, पेंच असे बरेच लहान मोठे अभयारण्य आहेत. ज्यांनी मला जिवंत ठेवले.

World heritage sites म्हणजेच UNESCO'S यनेस्को द्वारे जागतिक वारसा प्राप्त असणारी महाराष्ट्र राज्यात पाच ठिकाणे आहेत,  त्यातील माझे आवडते "कास पठार" हे सुद्धा असल्याचा मला अभिमान वाटतो. 



जगाने माझी दखल घ्यावी यापेक्षा सोनेरी क्षण तो काय ! महाराष्ट्र राज्यातील माणस, माती, पशु - पक्षी यांवर माझा खूप जीव, यासारखी जिवाभावाची माणस, माती ती कुठली असावी. 

खरच मला सहयाद्री असल्याचा जेवढा अभिमान आहे ! ना तेवढाच मी महाराष्ट्र राज्यात असल्याचा जास्त अभिमान आहे. ही महाराष्ट्र भूमी साधू संतांची भूमी, माझ्या राजा शिवबाची भूमी, शाहू, फुले, आंबेडकर, सावरकर, टिळक, राजगुरू, साने गुरुजी यांची ही भूमी ! 

इथेच माझ्या सानिध्यात आहेत, राजगड, रायगड आणि तोरणा ! इथेच आहे थेऊरचा चिंतामणी आहे औरंगाबादचा श्री क्षेत्र घृष्णेश्वर, पावन छोटी गंगा गोदावरी सुद्धा इथेच वाहते व भीमा सुद्धा माझ्या सानिध्यात राहते.

जाता जाता मंडळी एकच सांगेन की, 

भीती न आम्हां, तुझी मुळी ही,  गडगडणाऱ्या नभा ! अस्माना च्या सुलतानी ला, जवाब देती जीभा !!
सह्याद्री चा सिंह गर्जतो, शिव शंभो राजा ! 
दरी दरी तून नाद गुंजला महाराष्ट्र माझा !!

आत्मवृतात्मक निबंध - मी सह्याद्री बोलतोय मराठी निबंध. Me sahyadri boltoy marathi nibandh, Me sahyadri boltoy essay in marathi
 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने