तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध -tantradyanachi kimaya marathi nibandh


तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध -tantradyanachi kimaya  marathi nibandh

नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण तंत्रज्ञानाची किमया या विषयावर मराठीमध्ये वर्णनात्मक निबंध लिहिणार आहोत, तर वेळ घालवण्यापेक्षा चला सुरू करूया power of technology essay in marathi, Alchemy of Technology Marathi Essay, मराठीत तंत्रज्ञानाची किमया निबंध लिहायला.

तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध -

मनुष्यप्राण्याची उत्पत्ती झाली तशी तशी त्याने तंत्रज्ञानासोबत गट्टी केल्याची, विज्ञान आत्मसात केल्याचे दिसून येईल, मनुष्यप्राणी हा प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेला एकमेव जीव हे त्याने सिद्ध देखील केले आहे.

बघा तरी, ह्याच माणसाने अग्नीचा शोध लावला, पुढे चाकाचा शोध लागला, त्यानंतर वाफेचे इंजिन, दुर्बीण वगैरे अनेक शोध लागले याला तंत्रज्ञानाची किमयाच म्हणावी लागेल ना !

तंत्रज्ञानाची प्रगती करिता इंग्लंडमध्ये झालेली औद्योगिक क्रांतीला म्हत्वाची मानली जाते, कारण भारत स्वतंत्र होण्यापूर्वी पासूनच इंग्लड तसेच इतर पाश्चिमात्य देश हे तंत्रज्ञान विषयात प्रगती करत होते. 

तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध -tantradyanachi kimaya  marathi nibandh

तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध -tantradyanachi kimaya  marathi nibandh



त्यावेळेस भारतीय मात्र बऱ्याच बुरसटलेले विचारात गुंतलेले होते, जसे की सती प्रथा, अंधश्रद्धा, समुद्र पार करणे म्हणजे एक प्रकारे शास्त्रा विरोधी मानले जाई अश्या बऱ्याच प्रथा त्यावेळच्या भारतात होत्या.

अश्या प्रथा फक्त भारतात होत्या अस नाही, त्याला पाश्चिमात्य देश अपवाद नाहीत, कारण त्यावेळेस महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ याला सुद्धा त्याच्या शोधाबद्दल तुरुंगवास पत्करावा लागला होता, समाजाचा विरोध पत्करावा लागला होता.

हळूहळू का होईना तंत्रज्ञानाची किमया भारत देशामध्ये व्हायला सुरुवात झाली. डॉ. होमी भाभा, आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम, जयंत नारळीकर, रामानूजन, जगदीश चंद्र बोस अशी अनेक उदाहरणं देता येतील. 

यांनी तंत्रज्ञानाची किमया साधून भारत घडविला व आपला भारत देशाची ओळख पूर्ण देशांमध्ये व जगामध्ये पोचवली. पंजाब व हरियाणा येथील हरित क्रांती ही सुद्धा याचेच प्रतीक की ! 

झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध


ह्या तंत्रज्ञानाची किमयाचे काही फायदे आहेत. तसेच तोटेही सुद्धा आहेत ची ! तंत्रज्ञानाच्या किमयेमुळे आपण चंद्रावरती जाऊ शकलो. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी लवकरात लवकर पोचू शकलो. 

जसे की, रेल्वे, विमान, गाडी वाहतूक, पाण्यामध्ये जहाज यामुळे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, वेळेची बचत करून लवकरात लवकर पोहोचू शकतो. अगोदर पोस्टाच्या पत्राशिवाय शिवाय आपल्याला कोणाची ही खबरदारी, बातमी घेता येत नव्हती. 

Alchemy of technology marathi essay 


परंतु आजच्या युगामध्ये इंटरनेटच्या क्रांतीमुळे आपण मोबाईल, संगणक यांच्या मदतीने जगामध्ये कुठे व काय चाललय ? या घडामोडीची माहिती आपण सहज पाहू शकतो.

तसेच आपले नातेवाईक यांच्या संपर्का मध्ये व्हिडिओ कॉल द्वारे तसेच फोन द्वारे आपण सहज संपर्कात राहू शकतो. भारतामध्ये असा व्यक्ती दुर्लभ नाही की ज्याच्या खिशामध्ये एखादा मोबाईल मिळणार नाही.

तंत्रज्ञानामुळे अगोदरच्या मानवामध्ये व आताच्या मानवामध्ये खूपच फरक दिसून येतो ! कारण दुसरे महायुद्ध सुरू असताना अमेरिकेने जेव्हा हिरोशिमा व नागासाकी यावरती अणुबॉम्ब हल्ले केले. 

त्यावेळेस जपानचे न भरून येणारे नुकसान झाले, तरी छोट्याशा जपानने हार न मानता तंत्रज्ञानाच्या मदतीने, पुन्हा एकदा ताठ मानेने आपले वर्चस्व निर्माण केले. व अमेरिकेला पुन्हा नव्याने सुद्धा टक्कर दिली व देत आहे.

तंत्रज्ञानाच्या बाबतीत इस्राइल देश सुद्धा बाप देश आहे ! कारण इस्रायली तंत्रज्ञान हे खूपच विकसित असून, त्याला जगभरातून मागणी आहे. आपला भारत देश सुद्धा इस्रायलकडून अनेक तंत्रज्ञान विकत घेतो.  

मी फुलपाखरू झालो तर


जिथे अगोदर समुद्र पार करण हे पाप होत ! तर आता तोच मनुष्य सहज अवकाशामध्ये जाऊन सुद्धा येतो,  सुनिता विल्यमस, कल्पना चावला यांच्यासारख्या भारतीय कन्या वैज्ञानिक ह्या पृथ्वीवरून जाऊन अवकाशात भारताचा झेंडा वरती फडकवला.

दुर्देवी यामध्ये कल्पना चावला यांचे निधन झाले, त्यांना मानाचा मुजरा ! शेतकऱ्यांसाठी सुद्धा तंत्रज्ञान हे वरदानच ठरले आहे. कारण पाऊस केव्हा येईल ? वातावरण केव्हा खराब होईल ? 

तसेच समुद्रामध्ये गेलेले कोळी बांधवांना सुद्धा सुनामी सारख्या लाटा, अशी वादळ केव्हा येथील याचे अनुमान लावून, त्यांना सतर्कतेचा इशारा दिला जातो. ते केवळ तंत्रज्ञानाच्या वरदानामुळे शक्य झालेले आहे. 

जे उद्योगधंदे, कामे आपण हाताने करत होतो, मोठ्या कंपनीमध्ये - एम. आय. डी. सी ( औद्योगिक वसाहती) मध्ये यंत्रावर ती सहज रित्या तयार होतात. यासाठी लागणारे मनुष्यबळ सुद्धा खूप जास्त असल्याने नोकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. 

त्यामुळे अनेकांचे घराचा व स्वतःचा उदरनिर्वाह या वरती होतो, तसेच तंत्रज्ञानामुळे अनेकांनी रोजगार सुद्धा गमावली गेली आहेत.  हे विसरता कामा नये ! कारण त्यात तंत्रज्ञान एवढे आपल्या साठी लाभदायक आहे, तेवढेच ते धोकादायक सुद्धा आहे. 

कारण प्रत्येक गोष्टीचा दोन बाजू असतात, " ज्यातून आपल्या फक्त फायदाच न होता, त्यातून तोटा सुद्धा होऊ शकतो !  हे विसरता कामा नये. कारण डायनामाईटचा शोध लावताना हा मानवाच्या भल्यासाठीच लावला गेला होता.  मात्र त्याचा दुरुपयोग होईल हे त्या अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञांनास सुद्धा वाटले नव्हते. 

त्यामुळे तंत्रज्ञानाची किमया ही जसे फायदेशीर आहे,  तसेच धोकादायक सुद्धा आहे.  त्यामुळे त्याचा वापर करताना हा योग्य रित्या व मानवाच्या भल्यासाठीच केला गेला पाहिजे.

टेस्ला सारख्या कंपनीने मानव विरहित गाडी तयार करून,  एक नवीन युगाची नांदी तयार केलेली आहे. सध्या पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या भावामुळे सीएनजी गाड्या, इलेक्ट्रिक गाड्यांना खूपच मागणी वाढत चाललेली आहे. 

tantradyanachi kimaya  marathi nibandh


इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन हे पेट्रोल पंपाच्या ऐवजी दिसतील याबद्दल वाद नाही. पूर्वीच्या काळी म्हणजेच दहा वीस वर्षांपूर्वी आपल्याला लाईट बिल भरायचं असेल,  पाणी बिल भरायचे असेल किंवा इतर कोणतेही बिल भरायचे असल्यास, आपण मोठ्या मोठ्या रांगेमध्ये जाऊन तात्काळ उभे राहतो. 

मात्र आता मोबाईल द्वारे आपण गुगल पे, फोन पे, पेटीएम द्वारे ऑनलाईन हे सर्व बिल भरू शकतो व आपले वेळ वाचू शकतो.  
सिनेमाचे तिकीट काढण्यासाठी सुद्धा पूर्वी रांगाच्या रांगा लागायच्या ! मात्र आता हे काम एका मिनिटांमध्ये बुक माय शो यासारख्या मोबाईल ॲप द्वारे होऊन जाते. यालाच तर तंत्रज्ञानाची किमया म्हणावी लागेल .

आताची युद्ध ही टेक्नॉलॉजीच्या मार्फत होतात, कारण चीन सारखी देश हे हॅकर्स द्वारे, अनेक देशांची गोपनीय माहिती हॅक करून तो डेटा मिळवतात. व त्याचा गैरवापर करतात. त्यामुळे तंत्रज्ञान हे किती धोकादायक आहे हे समजते. 

बेटी बचायो बेटी पढायो

अनेक खातेदारांचे बँकेमध्ये खाते असते, तर ऑनलाईन बँकिंगद्वारे फ्रॉड करून त्यांच्या खात्यातील पैसे काढले जातात.  त्यालाच नायजेरियन फ्रॉड ( फिशिंग) असे म्हटले जाते. 

तंत्रज्ञानाची दोन बाजू एक चांगली एक वाईट,  त्यामुळे आपल्या दोन्ही बाजू ह्या समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. आपण मात्र ठरवूया की ! तंत्रज्ञानाच्या किमयेचा आपण चांगल्यासाठीच वापर करू, त्याचा दुरुपयोग करणार नाही म्हणून. 

तर मित्रांनो कसा वाटला तंत्रज्ञानाची किमया हा मराठी निबंध,  तुम्हाला अजून कोणत्याही विषयावरती निबंध हवा असेल तर,  मला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुम्हाला तो लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद. जय महाराष्ट्र.



टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने