वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध | Vruttapatra che manogat marathi nibandh

Vruttapatra che manogat marathi nibandh | वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध

Tags - Vruttapatrachi aatmkatha - वृत्तपत्राची आत्मकथा - वृत्तपत्राचे आत्मवृत्त - Newspaper Autobiography In Marathi - वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध - vruttaptra che manogat, वर्तमानपत्राचे मनोगत


नमस्कार विद्यार्थी मंडळी आजचा आपला निबंध आहे, " वृत्तपत्राचे आत्मवृत्त " हा निबंध. निबंध सुरू करण्यापूर्वी वृत्तपत्र याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. 

मुद्रणकला भारतात 16 व्या शतकात आली. सर्वप्रथम गोव्यामध्ये पोर्तुगीज मिशनरी यांनी त्याचा प्रसार केला. 29 जानेवारी 1780 रोजी पहिले भारतीय वृत्तपत्र बंगाल गॅझेट हे साप्ताहिक म्हणून जेम्स ऑगस्ट्स हिकी याने बंगाल मध्ये सुरू केले. महाराष्ट्र राज्यात 1789 मध्ये इंग्रजीतील बॉम्बे हेरॉल्ड ह्या साप्ताहिका पासून मुद्रण कला व वृत्तपत्र यांचा उदय झाला.

आत्मवृत्त, आत्मकथन या श्रेणीतील हा निबंध आहे.  तर एक वृत्तपत्र म्हणजेच आपले लाडके वर्तमानपत्र यास आपण इंग्लिश मध्ये न्युज पेपर असे म्हणतो, त्याबद्दल आजचा निबंध आहे तर चला सुरू करूया वृत्तपत्राचे मनोगत. 

Vruttapatra che manogat nibandh - वृत्तपत्राचे मनोगत निबंध 


नमस्कार वाचक मंडळी, ओळखलं का मला ? मीच तर तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडी काही मिनिटांमध्ये कळवतो !  तुमचं राशिभविष्य,  खेळाच्या बातम्या,  तुमच्या तालुक्याच्या - जिल्ह्याच्या, तुमच्या आवडत्या राजकीय पक्षाच्या, आवडत्या हीरो - हीरोइन यांच्या व त्यांच्या चित्रपटाच्या बाबत माहिती सुद्धा मीच देत असतो.

आता तरी ओळखलं की नाही ? अगदी बरोबर मी तुमचे वृत्तपत्र म्हणजेच वर्तमानपत्र. जगातील घडलेल्या चालू घडामोडी, तुम्हाला रोजच्या रोज कळवतो.  ते सुद्धा अगदी न चुकता तुमच्या वेळेत, तुमच्या घराजवळ येऊन. 

Vruttapatra che manogat marathi nibandh | वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध

वर्तमानपत्राचे मनोगत



मात्र एक गोष्ट सांगू का ? त्या गोष्टी तुम्हाला समजायच्या अगोदर त्या मला समजतात.  अनेक वृत्तपत्राच्या बरोबर माझे सुद्धा काम मध्यरात्रीच सुरू होत.  वर्तमानपत्राचे संपादक तसेच बातमीदार हे बातमी आणण्यासाठी खूप धडपड करत असतात, मेहनत घेत असतात. 

Vruttapatra chi aatmkatha - वृत्तपत्राची आत्मकथा 


महत्वाची बातमी आणल्यानंतर, पुन्हा त्याची जुळवाजुळव करतात व एका कोऱ्या कागदावर छापतात. त्यानंतर त्यातच माझा जन्म होतो.  याच कोऱ्या कागदावरती काही वेळात, तुम्हाला वृत्तपत्राचे नाव सुद्धा ठळक अक्षरात मध्यभागी दिसून येईल. 

जस की, लोकमत, लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, सामना, mumbai mirror, the hindu, inidian express अशी बरीच लांब लांब यादी आहे माझ्या भावंडांची. 

त्यानंतर त्याची किंमत व ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्या पहिल्या पानावरती ठळक व मोठ्या अक्षरात दिसतात. पुढे येतो संपादकीय कॉलम.  ह्या संपादकीय बातम्या, यामध्ये महत्त्वाची बातमी ही विश्लेषणात समजून सांगितली जाते. 

मी सह्याद्री बोलतोय


पुढचे पान असते ते, अर्थविश्व, अर्थव्यवस्था, अर्थविषयक जे तुम्हाला आर्थिक घडामोडी बद्दल माहिती देत असते, GDP दर, भांडवल बाजार, बँकिंग क्षेत्र यांची माहिती ह्या अर्थविषयक पानावर भरभरून असते.

असंच करत एकेक पान भरत तयार होतं वृत्तपत्र !  मला  चांगला रित्या सजवला जाते. यामध्ये जन्मदिवस असेल, एखादी सरकारी टेंडर नोटीस, नोकरी संदर्भ, हरवलेले व्यक्ती याचीसुद्धा माहिती माझ्या मदतीने जगामध्ये पोचवली जाते. 

शेवटला येते ते, सगळ्यांचे आवडते खेळाबद्दल माहिती देणारे पान.  जगभरात खेळलेल्या जाणाऱ्या क्रिकेट,  फुटबॉल,  हॉकी तसेच स्थानिक स्थरावरती वरती खेळल्या गेलेल्या खेळाबद्दल. कोण विजयी झाल !  कोण पराभूत झाले. याबद्दल माहिती छापण्यात येते.

newspaper autobiography in Marathi 


भविष्यात खेळले जाणारे संभाव्य खेळाबद्दल सुद्धा माहिती याच माझ्या पानावर असते.  हीच माहिती एकत्रित रित्या तयार होते, त्यास वर्तमानपत्र असे म्हंटले जाते. अश्यारित्या होतो माझा जन्म. 

मला मरण नाही, मी अमर आहे ! मी रोज उदयास येतो. त्यानंतर असे अनेक वृत्तपत्रे एकत्र करून आम्हाला जिल्यातील, तालुक्याच्या ठिकाणी रातोरात पाठवले जातात. 

योग्य ठिकाणी माझे घट्टे पोच झाल्यास, कोणी सायकलवर तर कोणी पायी चालट्झ तर कोणी मोटारसायकल वर येऊन तुमच्या पर्यंत मला पोच करीत असतो.  मी तुमच्या घरांमध्ये, अगदी तुमच्या हातात ताजेतवाने होऊन येत असतो. 

मी तसा खूप जुना काळ पाहिलेला आहे, इंग्रजांच्या पासून ते आतापर्यंत माझ्या मध्ये अनेक बदल होत गेले. नवभारत असो किंवा एबीपी वृत्तपत्र म्हणजेच अमृत बाजार पत्रिका होय. 
लोकमान्य टिळक यांचे केसरी,  मराठा वृत्तपत्र ते आताचे चालू लोकमत, लोकसत्ता सकाळ, महाराष्ट्र टाईम यांच्यासोबत माझी चांगलीच ओळख.

मला जेवढा वर्तमान काळात म्हणजेच आताच्या चालू काळामध्ये जेवढा भाव आहे, मात्र माझा भाव, मूल्य हे उद्याच्या दिवशी उतरले जाते. आज जे हातामध्ये वर्तमानपत्रात आहे ते वृत्तपत्र उद्या रद्दीमध्ये किरकोळ भावामध्ये मला विकले जाते.

मला याबद्दल काही वाटत नाही, माझी खरी किंमत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या स्पर्धेकाला विचारा! UPSC, SSC,  MPSC पासून तलाठी पोलीस भरती करणाऱ्या मुलांना माझी किंमत माहिती आहे.

अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची सकाळ the Hindu, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स पासून सुरू होते. त्यांच्या दिवस हा माझ्या पासून सुरू होतो. याचा मला सार्थ अभिमान आहे. 

माझे महत्व करणाऱ्याला मी कधीच बुद्धीहीन ठेवत नाही, माझे काम एकच जो मला मित्र समजेल त्याला मी बुद्धिमान करून ठेवतो. त्याला जगाचे चौफेर ज्ञान मीच देतो.  मी घडवलेत अनेक मोठ मोठे अधिकारी पण त्याचा घमंड कधी की केला नाही.  तर मित्रानो चला आता जातो, नवीन बातम्या छापण्याची वेळ झाली, उद्या सकाळी भेटू आता ! 

तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला आजचा "वृत्तपत्राचे मनोगत निबंध" खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून कोणते निबंध हवेत ते सुद्धा नक्की सांगा. 
धन्यवाद 

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने