माझा आवडता खेळ निबंध - maza avadta khel in marathi

माझा आवडता खेळ निबंध - maza avadta khel in marathi



Tags - my favorite game essay in marathi | majha avadta khel marathi nibandh | माझा आवडता खेळ मराठी निबंध | मराठी निबंध


तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझा आवडता खेळ या विषयावर मराठी मध्ये निबंध लिहू या.

आज आपण क्रिकेट या विषयावर मराठी निबंध लिहिणार आहे. कारण क्रिकेट न आवडणारी व्यक्ती मिळणे खरच खूप दुर्लभ गोष्ट आहे तर चला सुरवात करूया क्रिकेट खेळायला म्हणजेच क्रिकेटवर मराठी निबंध लिहायला. 


माझा आवडता खेळ निबंध

माझा आवडता खेळ मराठी निबंध


तसं शाळेत असताना आपण खोखो, लांब उडी, कबड्डी, उंच उडी, भालाला फेक या प्रकारचे खेळ खेळलेले असतात.  त्याचबरोबर घरी आल्यानंतर आपण क्रिकेट खेळतो, बाकीचे खेळ हे आपल्याला तंदुरुस्ती देतात, तसाच क्रिकेट हा खेळ तंदुरुस्ती सोबत आनंद सुद्धा देतो त्यामुळे क्रिकेट हा खेळ मला खूप आवडतो.

क्रिकेट खेळा मधील भारताचे स्थान खूप उंचावरचे आहे, भारताने आतापर्यंत ट्वेंटी चा तसेच एक  दिवसीय सामन्यातील विश्वचषक सुद्धा पटकावला आहे. एक कपिल देव  कर्णधार असताना तर दुसरा महेंद्रसिंग धोनी असताना. भारताने ही कामगिरी केली आहे.

त्यामुळे भारताचा दरारा हा पूर्ण जगामध्ये आहे. तसेच भारताला प्रतिस्पर्धी म्हणून ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड, साऊथ आफ्रिका, पाकिस्तान, वेस्टइंडीज, इंग्लंड यासारखे मजबूत संघ आहेत. 
भारताचा सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंग धोनी, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, कपिल देव, रवी शास्त्री, युवराज सिंग अशा अनेक खेळाडूंचे जगात अनेक चाहते मिळतील.

क्रिकेट खेळताना हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघामध्ये अकरा खेळाडू असतात, त्यानंतर नाणेफेक केली जाते, नाणेफेक मध्ये जो कौल जिंकेल तो प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी करतो. 
हे नाणेफेक जिंकलेल्या कर्णधाराच्या मनावर असते की, तो सुरुवातीला मैदानच निरीक्षण करतो व त्यानुसार तो फलंदाजी किंवा गोलंदाजी करतो. एकदिवशी सामने असेल तर पन्नास षटकांचा सामना असतो.

50 षटकामध्ये जितक्या धावा केल्या जातील,  त्याच्यापेक्षा एक डाव जास्त करून प्रतिस्पर्धी संघाला तो सामना जिंकावा लागतो. चौकार, षटकार यांची आतिशबाजी झाली असता क्रिकेटच्या मैदानावरील प्रेक्षक तसेच टीव्ही समोर बसले प्रेक्षक खूप मजा घेतात, आनंद लुटतात.

majha avdata khel marathi nibandh


काही लोक तर तिकीट किती महाग असली तरी दुसऱ्या देशांमध्ये जाऊन सुद्धा ती मॅच आवर्जून पाहतात. असे क्रिकेट रसिक खूपच मिळतील.
एका गोलंदाजाला जास्तीत जास्त दहा षटक टाकावे लागतात. कसोटीमध्ये पाच दिवसाचा सामना असतो प्रत्येक संघाला दोन वेळा फलंदाजी, दोन वेळा गोलंदाजी करण्याची संधी मिळते. मात्र काहीवेळा एकदाच फलंदाजी करून सुद्धा सामना जिंकता येतो.

क्रिकेटचा सामना खूप उत्साहवर्धक आहे, कारण जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत समजत नाही की विजेता कोण आहे. कारण कोणता खेळाडू कधी सामना पटकावेल हे सांगता येत नाही.

शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगतो, त्यामुळे पहिल्यापासून शेवटच्या बॉल पर्यंत अनेक लोकांचे मनाचे ठोके चुकले जातात त्यामुळे क्रिकेट हा खेळ मला खूप आवडतो.
तसेच माझे क्रिकेट आवडण्या मागच दुसरे कारण म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी जास्त लोकांची गरज भासत नाही. दोन ते तीन मित्र जरी असतील तरी आपण क्रिकेट छोट्या पटांगणात सहज खेळू शकतो.

क्रिकेट खेळण्यासाठी आपल्याला खर्च सुद्धा जास्त लागत नाही, फक्त एक बॅट एक बॉल जास्तीत जास्त हाच खर्च येतो. कारण स्टॅम्प आपण लाकडाचा सुद्धा घरी तयार करू शकतो, त्यामुळे मला क्रिकेट हा खेळ खूप खूप आवडतो.

my favorite game essay in marathi


लहान असताना कृष्णवर्णीय म्हणजेच ब्लॅक ॲण्ड व्हाइट टीव्ही वरती कपिल देव, रवी शस्त्री तसेच सचिन तेंडुलकर यांना खेळताना पाहिजे त्यावेळेस मला क्रिकेट खेळा बद्दल आकर्षण वाटू लागले.

आवड सुद्धा वाटू लागली क्रिकेट खेळल्यामुळे माझ्यामध्ये फिटनेस चांगला राहिला,  हो क्रिकेट मुळे माझा तचांगलाच व्यायाम होतो. क्रिकेट खेळाचे नियम तस म्हंटल तर 11 खेळाडू हे लागतात, त्याच बरोबर दोन हंपायर लागतात म्हणजेच मराठी आपण त्यांना पंच म्हणतो.

हे सर्व असतील तर आपण कायद्याच्या चाकोरीत क्रिकेट खेळू शकतो, तसेच चाकोरीच्या बाहेर खेळायचा म्हटले तरी आपल्याला तीन-चार मित्र जर एकत्र आले तर आपण चांगल्या प्रकारे क्रिकेट हा खेळ खेळू शकतो.

अगदी छोटे मैदानापासून मोठ्या मैदानामध्ये क्रिकेट हा खेळ आपण सहजरीत्या खेळू शकतो,  क्रिकेट खेळाबद्दल मला आवड निर्माण झाली ती म्हणजे राहुल द्रविड या खेळाडू मुळे.

कारण क्रिकेट खेळताना हा राहुल द्रविड कधी उत्कृष्ट फलंदाजी करायचा,  कधी यष्टीरक्षक असायचा तर कधी तो स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करायचा,  तो एकदिवसीय सामने, कसोटी सामने तसेच ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात मध्ये सुद्धा उत्कृष्टरित्या खेळायचा. 

हे निबंध सुद्धा वाचा - 



त्याने भारताचे कर्णधारपद सुद्धा भूषवले आहे.  तो खूप शांत व संयमी खेळाडू आहे.  तो कधी ओपनिंगला, वन डाऊनला तसेच  संघाला गरज भाषेत त्या ठिकाणी तो, त्या क्रमांकावर तो खेळ खेळायचा.
त्याने अनेक सामने भारतासाठी एक हाती जिंकून दिले आहेत, त्यामुळे मला क्रिकेट हा खेळ  व राहुल द्रविड हा खेळाडू खूप आवडतो… राहुल द्रविड हा माणूस म्हणून सुद्धा व एक प्रशिक्षक असल्याने मला तो खूप आवडतो.

क्रिकेट हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळला जातो, इंग्लंड देशाचा क्रिकेट हा राष्ट्रीय खेळ आहे मात्र भारताचा हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे.

क्रिकेट हा खेळ शांत डोक्याने संयमाने खेळणारे खेळाडू खूप कमी मिळतात, क्रिकेट हा खेळ शांत डोक्याने संयमाने खेळावा लागतो, कारण यामध्ये प्रतिस्पर्धी खेळाडू जर लवकर बाद होत नसेल,  तर त्याला बाद करण्यासाठी अनेक युक्त्या वापराव्या लागतात. त्यासाठी वेळोवेळी क्षेत्ररक्षण बदलावे लागते,  गोलंदाज बदलावी लागतात,  फास्ट गोलंदाजांना सोडून कधीकधी स्पिनर, कधीकधी पार्टटाईम गोलंदाज यांना सुद्धा संधी द्यावी लागते.

जसं की विश्वचषक चालू असताना महेंद्र सिंग धोनी कर्णधार असताना त्याने युवराज सिंग याला वेळोवेळी गोलंदाजी दिली होती,  त्या वेळी युवराज सिंग याने अनेक वेळा ज्या हव्या त्या विकेट मिळवून दिल्या होत्या. त्यामुळे क्रिकेट हा अनिश्चित अनियमित असा खेळ आहे या खेळाचे पारडे कधी कोणत्या संघाच्या विरूद्ध जाईल हे सांगता येत नाही त्यामुळे मला क्रिकेट हा खेळ खूप आवडतो...

तर मित्रांनो कसा वाटला माझा आवडता खेळ निबंध,तर तुमचा आवडता खेळ कोणता आहे मला कमेंट करून सांगा. 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने