माझे आजोबा मराठी निबंध - My grandfather essay in marathi

माझे आजोबा मराठी निबंध - My grandfather essay in marathi 


नमस्कार विद्यार्थी मंडळी आज आपण माझे आजोबा यावर मराठी निबंध लिहिणार आहोत म्हणजेच सर्वाना हवेहवेशे वाटणारे, लाड करणारे आजोबा यांचे वर निबंध म्हणजेच इंग्रजीमध्ये essay on my grandfather in marathi | My grandfather essay in marathi

My grandfather essay in marathi

My grandfather essay in marathi 


मित्र म्हणून जस सुदामा कृष्ण, कर्ण दुर्योधन अशी अनेक मूर्तिमंत दाखले देता येतील मात्र त्या सर्वांना पुरून उरेल अस एक मित्रत्वाचे नाते म्हणजेच आजोबा आणि नातू याचं. कारण म्हातारपण आणि बालपण यात फरक वयाचा असतो मात्र दोघांचा मेंदू तर एकदत्त होऊन एकाच कक्षेत, लयीत फिरत असतो.

ह्या नात्यात एक वेगळीच जादू असते, दूरदूर पर्यंत कुठे स्वार्थाचा लवलेश नाही. नातवाच्या आयुष्यात आजोबा म्हणजे बालपण - तरुणपण - म्हातारपण हा सर्वांची अनूभूती जगून अनुभवाचा अमृतकुंभ प्राशन करून आलेला सफेद केसांचा एक जादूगार.
कधी नातू रडायला लागला आणि जादूगाराने उंबरठ्यात पाऊल टाकले की हा चिमुला जीव अचानक हसायला लागतो. पाणी डोळ्यातल्या डोळ्यात गायब होऊन जातात. चालायला येत नसले तरी हा जीव आजूबाजूच्या लोकांचे सर्वस्व जुगारून आजोबाच्या, त्याच्या जवळच्या मित्राच्या अंगावर झेप घेत असतो.

कदाचित ह्याचसाठी ते रडणे असावे माझा आधार, माझा सोबती, माझा जोडीदार, कुठय माझा आजोबा ? मात्र आजोबांच्या दिसण्याने सर्वच प्रश्नावर पाणी पडून जाते. कारण त्याच उत्तर त्याला पांढऱ्या खुंट आलेल्या दाढीवर नाजूक हात फिरवताच मिळून जाते. हेच तर माझे सर्वस्व माझा आजोबा.
बाळाचा बाप कामावर तो संसाराच्या रहाटगाडग्यात बाळाचे भविष्य वेचायच्या प्रयत्नात. आई व आजी घरातील कामात व्यस्त मंग राहतो तो यासमयी बिनकामाचा मात्र घरातील वासे ज्याच्या पाठीवर भक्कम उभे आहेत असा हा युगपुरुष ! 

My grandfather marathi essay


माझे आजोबा सुद्धा असेच काही आहेत, माझ्या आजोबांना मी लाडाने बाबा म्हणतो. अगोदर ते बँकेमध्ये कामाला होते. मी लहान असताना कामावरून घरी येताना ते मला आवर्जून चॉकलेट आईस्क्रीम असे वेगवेगळे प्रकारचे खाऊ आणायचे.
माझ्या वरती खूप जीव लावायचे,  माझ्या बाबांचे पूर्ण नाव धोंडीबा कदम,  बाबा बँकेतून निवृत्त झाल्यापासून आता ते माझे आजोबा नसून माझे एक प्रकारचे मित्रच बनले आहेत.

वडील कामावर गेल्यानंतर घरी माझ्या जवळ फक्त आजोबा असतात, कारण आई आजी दोघी पण कामांमध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे माझ्याकडे लक्ष द्यायला फक्त आजोबा राहतात. तेच माझे सर्व हट्ट पुरवतात.
मला खांद्यावर बसून बाहेर गार्डन मध्ये फिरायला घेऊन जायचे, आता मी मोठा झालो तरी ते मला माझ्या शाळेमध्ये सोडायला स्कुटी वरती येतात व मला घरी घेऊन जायला ते शाळा सुटायच्या अगोदर येऊन थांबतात. माझा माझ्या बाबांवर खूप प्रेम आहे.
आता सध्या, माझे दहावीच वर्ष चालू असले तरी आजोबा मला वेळोवेळी आई कडून चहा बनवून, मला वाचण्यासाठी आणतात. 

माझी आजी मराठी निबंध


मी अभ्यास करतो का नाही ? मी वेळेवर झोपतो कि नाही ? त्या सर्व गोष्टी ते बारकाईने पाहतात व मला मार्गदर्शन करतात. त्यांच वय आता जरी 65 असेल तरी ते अजून दस्त पुष्ट आहेत खूपच तंदुरुस्त आहेत.
माझ्या आजोबांचे एमकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण झाले. तसेच त्यांना संगणकाचे आहे ज्ञान होते, त्यामुळे ते बँकेत क्लार्क या पदावर भरती झाले होते. महाराष्ट्र बँकेमध्ये क्लर्क पदावर असताना त्यांनी तेथे वीस वर्ष सर्विस केली.

त्यानंतर त्यांना मॅनेजर पदावर ती प्रमोशन मिळाले, त्यांना मॅनेजर पदाची प्रमोशन हे आमच्या तालुक्याचे ठिकाणी मिळाल्याने मला खूप आनंद झाला होता !  मात्र त्यापेक्षा जास्त आनंद मला ते जेव्हा बँकेमधून निवृत्त झाले त्यावर झाला होता.

कारण मला माझा मित्र पूर्णपणे वेळ देणार होता, माझ्यासोबत राहणार होता ! त्याच्या पुढ आयुष्य आहे तेव्हढे माझ्या सोबत घालवणार होता, त्यामुळे मला त्या क्षणाचा खूप आनंद वाटतो.
आज सुद्धा आम्हा दोघांना पाहून आनंदून जाते, आणि माझ्या वडिलांना सुद्धा मी घरी एकटा असल्याची काळजी वाटत नाही. ते बिंदास कामावरती निघून जातात. कारण माझ्यासोबत माझे बाबा असतात. 

मी फुलपाखरू झालो तर 


मी लहान असताना माझ्या बाबांनीच मला सायकल शिकवली. मला पोहायला शिकवले तसेच ते माझ्यासोबत क्रिकेट ॲकॅडमी कॅरम यासारखे खेळ सुद्धा खेळायचे.
मी शाळेतून अभ्यास करून आल्यानंतर, माझा गृहपाठ माझे बाबाच करून घ्यायचे. यांच्यामुळेच माझे गणित विज्ञान तसेच मराठीचा पाया मजबूत झाला. झोपत नसेल तर बापू मला छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग - राजगुरू, महाराणा प्रताप यांच्या कहाण्या वाचून दाखवायचे.

गेला महिना मध्येच मला आजोबांनी रायगड किल्ला दाखवला. खरच खूप छान असा हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी असलेला रायगड हा खूपच भव्य असा आहे.
वर रायगडावर गेल्यानंतर मला आजोबांनी हिरकणी बुरुज, कडेलोट करायचे ठिकाण, दरबार, राजा व राणी आणि राहायचे महाल, छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी व जगदीश्वर मंदिर असे ठिकाण दाखवले.

गेल्यावर्षी आजोबांनी मला मुंबई दाखवली होती. माझे आजोबा मला असे अनेक वेळा बाहेर फिरायला नेतात. मला आठवतं मागच्या वाढदिवसाला माझ्या बाबांनी मला एक घड्याळ गिफ्ट म्हणून दिलं होतं, खरंच खूप छान असं गिफ्ट होते. ते पाहून माझे इतर मित्र म्हणायचे की मला खरच तुझ्यासारखे आजोबा हवे होते! 

शाळेतील शिपाई निबंध


त्यावेळेस मला माझ्या आजोबांचा खूप अभिमान वाटला. खरच मी खूप भाग्यवान आहेत की, मला खूप चांगले आजोबा मिळाले ! त्याबद्दल मी देवाचा खूप ऋणी आहे. तर चला मित्रांनो आजोबा मला हाक मारत आहेत . माझी आता घरी जायची वेळ झाली.
तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कसा वाटला ? माझे आजोबा मराठी निबंध !  मला नक्की कमेंट मध्ये कळवा व तुम्हाला अजून कोणती निबंध हवी असतील, तर मला ते सुद्धा सांगा मी ते लवकरात लवकर देण्याचा

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने