शाळेतील शिपाईचे काकाचे मनोगत - Shaletil shipai che manogat essay in marathi

शाळेतील शिपाईचे  मनोगत - Shaletil shipai che manogat marathi nibandh


Tags - Shaletil shipai essay in marathi| 
Autobiography of school peon in marathi |
शाळेतील शिपाई मराठी निबंध | मी शिपाई बोलतोय मराठी निबंध


मी शिपाई बोलतोय मराठी निबंध - me shipai boltoy essay in marathi

मी शिपाई बोलतोय मराठी निबंध - me shipai boltoy essay in marathi

तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या " शाळेतील शिपाई" यांच्या वरती मराठीमध्ये निबंध लिहिणार आहोत.  तर चला सुरवात करूया आपण आपल्या निबंधाला "मी शिपाई बोलतोय" मराठी निबंध.


नमस्कार मित्रांनो,  मी तुमच्या शाळेतीलच आहे बर का ! तुमची शाळा कोणती छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर पुणे, हीच ना ?  येथेच तर मी नेहमी असतो तुम्ही शाळेत यायच्या अगोदर मी येतो.
तुम्ही घरी गेल्या नंतर मी घरी जातो. ओळखलं का मला ?  हो मीच तर खाकी ड्रेस वर नेहमी असतो व तुम्हाला घरी जाण्यासाठी बेल तर कोण मीच वाजवतो ना ? अजून तुम्ही ओळखल असेल नसेल तरी मी सांगतो. 


मी तुमचा आवडता तुमच्या विद्यामंदिर शाळेतील शिपाई काका, होय मीच मोरे काका. तर आज मी माझं मनोगत तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरु करूया माझ्या मनोगताला.

मी तुमचा आवडता मोरे काका या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर शाळा, पुणे येथील शिपाई. माझ मूळ गाव पुणे जिल्ह्यातील भोर तालुका, येते मी लहानाचा मोठा झालो.
घरची परिस्थिती नसल्याने थोडीफार मराठी शाळेत शिक्षण घेतलं त्यानंतर वडिलांसोबत इकडे पुण्याला आलो. त्यानंतर सुद्धा घरची परिस्थिती ठीक नसल्याने वडील कामावर जायचे.



आई सुद्धा कामावर जायची घरी कोण मी, माझा भाऊ व एक बहीण घरातील मी मोठा असल्याने मला सुद्धा कुठेतरी कामावर जायला लागायचं इकडे तिकडे मिळेल ते काम करायचो.
एकदा घरी असताना, मी दहावी पास असल्याने नोकरी संदर्भ या वृत्तपत्रामध्ये शिपाई या पदावर नोकरीचा अर्ज करण्याबाबत जाहिरात आल्याने, मी सदरच्या जाहिरातीसाठी अर्ज केला व परीक्षा दिल्यानंतर मीसुद्धा या परीक्षेत पास झालो.


Shaletil shipai essay in marathi


वीस वर्षांपूर्वी या आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर शाळेमध्ये, शिपाई या पदावर रुजू झालो. तेव्हा माझ्या आनंदाची व्याख्या न केलेलीच बरी माझे आई-वडील भाऊ-बहीण हे सर्व खुश झाले.


माझ्या आईला आता वडिलांना कष्ट करण्याची गरज नव्हती माझ्या तुटपुंज्या पगारात माझं घर चालणार होत, त्यामुळे मी सुद्धा खुश होतो.
सुरवातीला कामावर आल्यावर मला थोडं दडपण होतं परंतु येथील मुख्याध्यापक तसेच इतर शिक्षक वृंद खूप चांगले असल्याने माझ्या मनावर काही दडपण नव्हते.
मी शाळेमध्ये आल्यावर सुरुवातीला कचरा काढणे, साफसफाई करणे, वर्ग झाडू मारणे, पाण्याची सोय लावणे, घंटा वाजवणे तसेच गेट चालू करणे, गेट बंद करणे, वर्ग बंद करणे यासारखी कामे करत होतो.


मात्र आता मला वीस वर्ष झाल्यानंतर, मी येथील वरिष्ठ शिपाई असल्याने इतर शिपाई वर्गावर मी देखरेख ठेवून त्यांच्याकडून कामे करून घेतो.
म्हणजे मी जे अगोदर काम सर्वांमध्ये वाटून देतो व त्यांच्याकडून ते करून घेतो व त्याची पाहणी करतो.
प्रत्यक्ष शिपायाला मी वेगवेगळे काम नेमून दिलेले आहे. त्याप्रकारे त्यांच्याकडून कामे करून घेतो, काही शिपाई अंगणाची साफसफाई करतात, काही शिपाई पाणी भरतात, झाडांना पाणी घालतात, काही शिपाई वर्गाची साफसफाई करतात, लाईट लावणे, पंखा लावणे या प्रकारे अनेक कामे ते करतात.


मी मात्र वेळेवर ती घंटा वाजवतो व विषयाचा क्लास बदलण्याची,  शाळेला सुट्टी,  दुपारची सुट्टी,  जेवणाची सुट्टी झाल्याबद्दल बेल वाजवतो. ही आता फक्त काम माझ्याजवळ उरलेले आहेत.

शाळेतील शिपाई मराठी निबंध


मी सुद्धा येथे शिक्षकांवर प्रेम करतो ते शिक्षक सुद्धा मला आदराने वागतात. माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे यावर्षीचा 15 ऑगस्ट चा आपल्या भारतीय राष्ट्रीय ध्वज तिरंगा हा माझ्या हस्ते फडकवला.
या मुळे मला माझा आनंद गगनात मावेनासा झाला,  खरच मी खूप भाग्यवान आहे. की मला या शाळेची सेवा करायला मिळाली.  मला येतील विद्यार्थीसुद्धा तसेच शिक्षक सुद्धा मला प्रेमाने "मोरे काका" अशी हाक मारतात.

Shalecha Shipai essay in Marathi language | शाळेचा शिपाई मराठी निबंध



काही मुले तर मला आवर्जून चॉकलेट - कॅडबरी, डब्यातील खाऊ सुद्धा खायला देतात. खरंच एवढं प्रेम कुठेच मिळाले नसते, खरच मी खूप भाग्यवान आहे.
शाळेमध्ये सगळ्यात जास्त मजा येते ते म्हणजे गॅदरिंगला. कारण याच दिवशी पूर्ण शाळा सजवली जाते, रंगवली जाते. येथील विद्यार्थी वेगवेगळे प्रोग्राम करतात. काही खेळ खेळले जातात,  कबड्डी, खो-खो,  क्रिकेट, हॉलीबॉल, फुटबॉल तसेच इतर कार्यक्रम सुद्धा होतात.


यामध्ये निबंध लेखन, वकृत्व, नृत्य त्यावेळेस शाळेची शोभा ही पाहण्याजोगी असते. इतर शिक्षक सुद्धा गायन करतात, पेटी वाजवतात. आमचे छत्रपती शिवाजी महाराज विद्या मंदिर हे खरंच खूप सुरेख आहे. येथे सर्व एकजीव झालेली आहेत.
सकाळी सकाळी ज्या वेळेस विद्यार्थी शाळेमध्ये येतात त्या वेळेस मला आवर्जून गुड मॉर्निंग काका - गुड मॉर्निंग काका असे बोलतात व जाताना सुद्धा बोलतात की तुम्ही स्वतः लवकर घरी जात जावा. 


हे निबंध सुद्धा संग्रही ठेवा - 

माझा आवडता खेळ

परंतु मी माझी नोकरी सोडून घरी लवकर जाऊ शकत नाही, तरी मला त्याबद्दल काही वाटत नाही, कारण माझा घरचा उदरनिर्वाह यावर चालतो व मी माझ्या कामाबद्दल खूप खुश आहे.
तर मित्रांनो ! चला आता गेट बंद करून घरी जायची वेळ झाली. माझी मुलं घरी माझी वाट पाहत असतील. तर पुन्हा भेटू आपण केव्हा तरी याच वळणावर याच शाळेमध्ये चला बाय बाय... 

तर मित्रानो तुमच्या शाळेतील शिपाई मामा विषयीच्या तुमच्या भावना थोडक्यात सांगा ?
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने